घुग्घुस :
येथील वर्धा नदीच्या पुलावरून आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह सोमवार, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आढळला.
मोबाईलवर सांभाषण करीत एका युवकाने उडी घेतल्याची घटना शनिवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली होती.
घुग्घुस-वणी मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून प्रकाश पेंदाने (३३ रा. वेळाबाई ता. वणी) या युवकाने मोबाईलवर संभाषण करीत मोबाईल पुलावरच ठेवून पुलावरून वर्धा नदीत उडी घेतली ही घटना काही प्रत्यक्षदर्शिनी बघितली होती.
याबाबत कळताच घुग्घुसचे ठाणेदार आसिफराजा शेख, सहा. पो. नि. प्रशांत साखरे, निलेश तुमसरे यांनी घटनास्थळ गाठले.
ठाणेदार आसिफराजा शेख यांनी चंद्रपूर येथून बचाव पथकास पाचरण केले होते.
बचाव पथकाचे पो. हवा. अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, गिरीश मरापे, सुजित मोगरे, उमेश बनकर यांनी बोटीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली परंतु शोध लागला नाही.
त्यामुळे रविवार, १७ डिसेंबर रोजी शोध मोहीम सुरूच होती परंतु मृतदेह आढळला नाही. याप्रकरणी पोलिसांनी मोबाईल जप्त केला.
अखेर सोमवार, १८ डिसेंबर रोजी ५:३० वाजता सायंकाळच्या सुमारास बचाव पथकास मृतदेह आढळला.










